मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक; शेती, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, काय आहे National Agriculture Code? – Marathi News | Modi government’s master stroke; Agriculture, big update for farmers, what is National Agriculture Code

काही महिन्यांपूर्वी भारतातील मसाल्यांमध्ये कीटकनाशक सापडण्याच्या बातम्यांनी जगभरात धडकी भरवली होती. त्यानंतर अनेक देशांमध्ये भारतीय मसाल्यांवर धडाधड बंदी घालण्यात आली. अनेक मोठ्या ब्रँड्सची नाचक्की झाली. जगभरात लोकप्रिय असलेल्या भारतीय मसाल्यांबाबत साशंकता वाढली. या कंपन्यांवर कारवाईनंतर मोदी सरकारने शेतीसंबंधीच्या अनेक उत्पादनांना रसायनमुक्त करण्याचा आणि त्यांची गुणवत्ता वाढीसंबंधी मोठा निर्णय घेतला. परदेशात जशी शेती उत्पादनासंबंधी काही मानकं ठरवण्यात आली आहे. गुणवत्तेवर भर देण्यात येतो. तसेच भारतीय कृषी उत्पादनांची मानकं ठरवण्यात यावी यासाठी आणि गुणवत्ता, दर्जा अबाधित राहावा यासाठी पाऊलं टाकण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी संहिता (National Agriculture Code) तयार करण्यात येत आहे.

BIS कडे मोठी जबाबदारी

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो २०१९पूर्वीची शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार पीएम किसान आणि नमो सन्मानचा लाभ.. नवे नियम लागू!

देशात वस्तू, उत्पादन आणि प्रक्रिया याची गुणवत्ता ठरवण्याचे काम भारतीय मानक ब्युरोकडे (BIS) आहे. सोन्यापासून ते तलम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर अनेक उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यावर ‘हॉलमार्किंग’ आणि ‘स्टार रेटिंग’ देण्यात येते. त्याआधारे त्या त्या वस्तूची गुणवत्ता, दर्जाची हमी सरकार घेते. आता त्याच धरतीवर बीआयएस कृषी उत्पादनांसाठी राष्ट्रीय कृषी संहिता तयार करत आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय कृषी संहिता काय?

वृत्त संस्थांनुसार, भारतीय मानक ब्युरो कृषी क्षेत्रातील गुणवत्ता आणि सर्वोत्तम दर्जा वाढीसाठी राष्ट्रीय कृषी संहिता विकसीत करणार आहे. हा कोड विकसीत झाल्यानंतर त्या त्या क्षेत्रातील उत्पादनांना एक कोड आणि ओळख देण्यात येईल. ज्या भागात उत्पादनाची गुणवत्ता घसरलेली आहे, दर्जा कमी झालेला आहे. तिथे गुणवत्ता वाढीसाठी चालना देण्यात येईल. त्याठिकाणी विविध प्रयोग करण्यात येतील.

हे वाचलंत का? -  PM Kisan | ही 4 कामे झटपट उरकवा, नाहीतर खात्यात येणारा पैसा विसरा - Marathi News | These 4 tasks are required to get the 15th installment of PM Kisan, otherwise, how will the money come into the account

यापूर्वी बीआयएसने राष्ट्रीय भवन संहिता तयार केली आहे. वीज निर्मिती क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत संहिता तयार केली आहे. आता या संस्थेवर कृषीसंबंधित उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय कृषी संहिता तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्याचा मोठा फायदा होईल.

काय होईल फायदा?

राष्ट्रीय कृषी कोड आणल्यानंतर काय फायदा होईल असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बीआयएसचे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सध्या देशात कृषी यंत्र, संयंत्रपासून ते कच्चा मालापर्यंतचे उत्पादनं आणि सेवांच्या गुणवत्तेवर भर दिला आहे. या नवीन संहितेमुळे भारतीय कृषी गुणवत्ता संस्कृती वाढीस लागेल. यापूर्वी भारतीय बी-बियाणे सकस होती. पण उत्पादन वाढीसाठी त्यावर रसायनकी खते, कीटकनाशकांचा वापर वाढल्याने शेतीची समीकरणं बदलली. अनेक धान्य, पिकं, भाजीपालावर रसायनं, कीटकनाशकांच्या वापराने मानवी आरोग्यावर परिणाम दिसू लागेल. या नवीन प्रयत्नांमुळे आरोग्यदायी शेतीकडे पावलं वळण्यास सुरुवात होईल. तर परदेशात भारतीय मालाला अधिक मागणी येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हे वाचलंत का? -  दहा कोटींची ही कार नव्हे, हा आहे काजू-बदाम खाणारा रेडा...पाहण्यासाठी गर्दीत होणारच - Marathi News | Golu 2 buffalo of ten crores entered the Patna farmers melava marathi news


Web Title – मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक; शेती, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, काय आहे National Agriculture Code? – Marathi News | Modi government’s master stroke; Agriculture, big update for farmers, what is National Agriculture Code

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj