कांदा निर्यातीला फटका, बांगलादेश हिंसाचार
बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. 3 हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये पडून आहे. बांगलादेशाच्या बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक ट्रक निर्यातीसाठी उभे आहेत. हा कांदा खराब होण्याची भीती आहे. परिणामी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे बाजार भाव स्थिर आहेत. बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशातंर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.
व्यापाऱ्यांना मोठा फटका
बांगलादेशामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम आता कांदा निर्यातीवर झाल्याचे दिसून आले. बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. या ट्रकमध्ये तीन हजार टनाहून अधिक आहे कांदा आहे. जास्त दिवस हे सचार सुरू राहिल्यास कांदा निर्यात न झाल्यास त्यात ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हा कांदा खराब होईल. या पाठीमागे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे सुद्धा वाचा
इतका होतो कांदा निर्यात
सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा हा बांगलादेशात जातो. बांग्लादेश हा प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या हिंसाचाराचा मोठा परिणाम व्यापारावर झाला आहे. बांगलादेशची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. बांगलादेशाच्या चलनाचे जवळपास 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. त्याचा परिणाम व्यापारावर दिसेल.
देशात सध्या काय भाव
तसेच स्थानिक बाजारात पावसाळी वातावरण असल्याने आवक कमी असल्यामुळे बाजारभाव दोन हजार ते सत्तावीसशे रुपयांपर्यंत स्थिर आहे. बांगलादेशात परिस्थिती आटोक्यात न आल्यास कांदा निर्यात होणार नाही. स्थानिक बाजारात आवक वाढेल आणि भाव गडगडेल. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेश व इतर देशांमध्ये जास्तीत जास्त कशी कांद्याची निर्यात होईल यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकरी संघटना, कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.
Web Title – Bangladesh Crisis : लासलगावच्या कांद्याला मोठा फटका; बांग्लादेश हिंसाचाराचा असा पण परिणाम, भाव गडगडण्याची भीती – Marathi News | Bangladesh Crisis Violence Onion Export in Bangladesh has hit Indian farmers hard, onion export has a big impact, onion producers are in trouble