मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

म्हाडाची विशेष भेट.. ठाण्या मुंबईत तब्बल इतक्या घरांची लॉटरी..

Thane Mumbai 1 bhk flat: लवकरच 2000 घरांची लॉटरी म्हाडाच्या मुंबई विभागाकडून काढण्यात येणार आहे; कोकण मंडळानेही लॉटरीची तयारी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे. लॉटरीसाठी (MHADA Lottery) घरांची जुळवाजुळव केली जात असून लवकरच त्यासाठीची बैठक सुद्धा होणार आहे. सुमारे नऊ हजार घरे ही कोकण मंडळात असून आणखी काही घरांची भर पडू शकते, असे कोकण मंडळाच्या सूत्रांद्वारे कळून येत आहे.

म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील पात्र अर्जदारांना देकार पत्रे देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुंबई मंडळाकडून 2 हजार (Thane Mumbai 1 bhk flat) घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची घोषणा केली होती. आता लोकांचे लक्ष कोकण मंडळ गृहनिर्माण सोडतीकडे लागले आहे. मंडळाकडून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी लॉटरी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मुंबई, कोकण आणि पुणे विभागांचा समावेश आहे.

हे वाचलंत का? -  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा काय?; विधानसभेत घोषणांचा पाऊस - Marathi News | Chief Minister Eknath Shinde made these announcements in the Legislative Assembly for the loss affected farmers

शेतकर्‍यांनो! पीक विमा झाला मंजूर; पहा तुम्हाला मिळणार का?

3,000 पेक्षा जास्त घरे

तीन हजारांहून अधिक नवीन घरे मंडळाची आहेत. यामध्ये सुमारे 900 घरे ही 20 टक्के योजनेंतर्गत, तर म्हाडा आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1,500 हून अधिक घरांचा समावेश केला गेला आहे. यामध्ये मागील लॉटरीत (MHADA Lottery) विक्री न झालेल्या 4,000 हून अधिक घरांचाही समावेश करण्यात आला आहे. ड्रॉची घोषणा काही दिवसांत मुंबई विभागात प्रसिद्ध होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोकण मंडळानेही सोडतीची तयारी सुरू केली आहे.

येथे वाचा – शेतकर्‍यांचं कर्ज माफ होणार? ‘या’ शेतकर्‍यांना मिळू शकते 3 लाखांपर्यंत कर्ज माफी, पहा कामाची बातमी..!

हे वाचलंत का? -  NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth


Web Title – म्हाडाची विशेष भेट.. ठाण्या मुंबईत तब्बल इतक्या घरांची लॉटरी..

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj