Ration Card Update: आपल्या राज्यातील नागरिकांसाठी एक फार महत्त्वाची आणि विशेष बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एक मोठी भेट दिली होती. आता या भेटवस्तूचे वितरण सुरू करण्यात आले आहे. Ration Card Update
मात्र राज्य सरकारने शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या भेट देण्याची योजना सुरू केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आणि त्यांनतर ही साडीची भेट बंद करण्यात आली होती. मात्र आता आचारसंहितेमधे शिथिलता आल्याने साडी वाटपाचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील 66 हजार 104 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना या साड्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Update) आता सरकारकडून लाल, हिरवा, पिवळा आणि निळा अशा चार रंगात साड्या मिळणार आहेत.
शेतकऱ्यांनो, तब्बल इतक्या कोटींची नुकसाभरपाई जाहीर.., पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती..
हा साडी वितरण करण्याचा कार्यक्रम स्वस्त धान्य दुकानांमध्ये राबवण्यात येणार असून, पुरवठा विभागाने स्वस्त धान्य विक्रेत्यांना या प्रणालीवर आधारित मशीनचे वाटप केले आहे. या नवीन मशिनवर साड्या वाटपाची माहिती नोंदवली जाणार आहे, ज्यांना याआधी साड्या मिळाल्या आहेत, त्या लाभार्थ्यांना याच्या मदतीने वगळता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे साडी वाटपाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता जिल्ह्यातील सुमारे 66 हजार शिधापत्रिकाधारकांना साडी वाटण्याचा कार्यक्रम कार्यक्रम राबविला जात असून, उर्वरित 60 टक्के शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Update) साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे, आणि त्याची सुरुवात देखील केली गेली आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो मोठी बातमी पीएम किसान योजनेच्या हप्त्यात तब्बल इतक्या रुपयांची वाढ..
Web Title – काय सांगता? या जिल्ह्यातील महिलांना आता रेशन सोबतच साडी पण मिळणार.. 66 हजार नागरिकांनी घेतला लाभ..