मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

सोयाबीन पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर – Marathi News | Maharashtra farmer news agricultural news marathwada pune mumbai nashik kolhapur satara nagpur

महाराष्ट्र : परभणी (parbhani news) जिल्ह्यात साधारण दिवसापासून पावसाने उघडी घेतली. त्यामुळे खरीप पिके (kharip crop) धोक्यात आली आहे. पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे पावसाअभावी सोयाबीन पीक वाढत नसल्याने शेतकऱ्याने (Farmer news) एक हेक्टर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. या आठवड्यात पाऊस झाला नाही, तर पिकांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे.

वर्धा जिल्ह्यात पहाटेपासून आज पाऊस सुरु झाला आहे. जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे पिकांना संजीवनी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे उकाड्यापासूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे वाचलंत का? -  नवीन सरकार PM Kisan बंद करणार? मग नीती आयोग का घेत आहे योजनेचा आढावा - Marathi News | Five years of PM Kisan Yojana, check why Niti Aayog is doing it, will PM Kisan be closed

पंधरा दिवसापासून गायब झालेला पाऊस हा काल रात्री गोंदिया जिल्ह्यात पुन्हा सुरु झाला आहे. शेतकऱ्यांनी एक सुटकेचा श्वास घेतला. त्याला कारणही तसंच आहे, मागच्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दांडी मारली होती. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत होता. पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करणारे शेतकरी त्यांच्या शेतामधील भात पीक सुकन्याची वेळ आली होती.

हे सुद्धा वाचानंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ऊस उत्पादक शेतकरी यांच्या पिकांवर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी आता ड्रोन द्वारे फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचलंत का? -  शेतकरी आंदोलन कशासाठी? स्वामीनाथन यांचा C2+50% फॉर्मूला काय? - Marathi News | Farmers movement along with MSP to implement the Swaminathan report marathi news

एकीकडे टोमॅटोच्या दरात घसरण सुरु आहे, दुसरीकडे टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव पडू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. येवल्यातील वडगाव येथे टोमॅटो काळे पडून गळ देखील होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

येवला तालुक्यातील वडगाव येथील भाऊसाहेब कापसे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र आता या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणू लागल्याने टोमॅटो झाडावरच पिवळे पडून काळे देखील पडत असल्याने टोमॅटोची गळ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

हे वाचलंत का? -  पाऊस कमी झाल्यामु्ळे शेतातली पीके करपली, शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी - Marathi News | Kharip season crop destroyed inregular rain in maharashtra


Web Title – सोयाबीन पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर – Marathi News | Maharashtra farmer news agricultural news marathwada pune mumbai nashik kolhapur satara nagpur

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj