मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम – Marathi News | Maharashtra rain update Farmer News agricultural cotton cultivation crop destroyed

महाराष्ट्र : नंदूरबार (Maharashtra rain update) तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस गायब झाल्यामुळे पिके (crop destroyed) धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले, तरीही पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी हलका ते मध्यम पावसावर पिकांची पेरणी आणि कापूस लागवड (cotton cultivation) केली होती. शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी अशी आंतर मशागतीचे कामे उरकून पिकांना खते आणि फवारणीचे कामे सुरू आहे.

शेती पिकाला पाणीचं नसल्याने फवारणी केल्याने काय फायदा होणार असे अनेक प्रश्न आता बळीराजासमोर उपस्थित झाला आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावा लागणार अशी परिस्थिती आता नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस गायब झाला आहे. तालुक्यात रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. अनेकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागली. मात्र जोरदार पाऊस नसल्याने बोरवेल पाणीपातळीही घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहेत.

हे वाचलंत का? -  यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस... काय आहे भेडंवड घट मांडणीतील भाकीत?

हे सुद्धा वाचा



हे वाचलंत का? -  मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक; शेती, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, काय आहे National Agriculture Code? - Marathi News | Modi government's master stroke; Agriculture, big update for farmers, what is National Agriculture Code

धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीवर भर दिलेला आहे. वारंवार कोळपणी आणि निंदणी करून तन वाढु न देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत, जेणेकरून पिकांना तूरळक पावसातही तग धरायला मदत होईल. मात्र मेहनतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे आणि शेतकऱ्यांना जास्त मेहनतही घ्यावी लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुसळधार पावसाची आहे.

हे वाचलंत का? -  सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी तब्बल एवढी आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार..


Web Title – Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम – Marathi News | Maharashtra rain update Farmer News agricultural cotton cultivation crop destroyed

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj