मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीकं त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक शेतकरी आपल्या नुकसान झाल्याची तक्रार सरकार दरबारी करीत आहेत.

Image Credit source: tv9marathi
भुसावळ : बाजारपेठेत (Market) धान्यांची आवक वाढली आणि भावही तेजीत अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain)नुकसानीनंतर हरभरा, मका, केळीने शेतकऱ्यांना तारले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भुसावळ (Bhusaval) जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत यावल, रावेर, भुसावळ मुक्ताईनगर यांच्यापेक्षा भाव अधिक मिळत आहेत. त्यामुळे बाजार समितीत गहू, हरभरा, दादर, सूर्यफूल, मक्याची आवक वाढली आहे. दुसरीकडे, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठ नुकसान झालं आहे. अनेक शेतकरी अद्याप त्यातून सावरलेले नाहीत. शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.
चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत
मार्केटला सध्या हरभऱ्यात मॅक्सिको, पी. के. व्हीटू धान्याची आवक मोठ्या प्रमाणावर आवक आहे. यात व्हीटू चण्याला (प्रतिक्विंटल) ७२७६ ते ७७१७ इतका, तर मॅक्सिकोला १० हजार ते ११,३२५ भाव आहे. हा भाव आजवरचा सर्वाधिक असल्याचे जाणकार सांगतात. दादर ३८०० ते ४६००, गहू २ हजार ते २५००, मका १७०० ते २०११, सूर्यफूल ३३२६ ते ४५०० इतका भाव आहे. अवकाळी पाऊस पडल्यानंतर चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत असल्याचं चित्र आहे.
डॉलर चण्याला आखाती देशात मागणी
खान्देशातील मॅक्सिको, डॉलर चण्याला आखाती देशात मागणी असते. अवकाळीमुळे काही प्रमाणात शेतमालाचे नुकसान, माल कमी येतो. पण त्यामुळेच भावदेखील वाढतो या वर्षी केळीचे भाव चांगले आहेत. केळीने शेतकऱ्यांना तारले असे म्हणता येईल. सप्टेंबरपासून व्यापारी बाजारपेठेत येणारा कांदेबाग आणि मेपासून निघणारा मृगबाग यांत पिकांचा दर्जा चांगला आहे.
मागच्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीकं त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक शेतकरी आपल्या नुकसान झाल्याची तक्रार सरकार दरबारी करीत आहेत.
Web Title – बाजारपेठेत धान्याची आवक वाढली, भावात तेजी कायम असल्याने शेतकरी सुखावला – The arrival of grain in the market increased, the farmers were happy as the prices continued to rise
