कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नाफेडपासून सुरू असलेली कांदा खरेदी अचानक बंद झाल्याने बळीराजा धास्तावला गेला आहे.

Image Credit source: TV9 Network
लासलगाव ( नाशिक ) : लाल कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु होती. ती अचानक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी जास्तीजास्त 1141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत दर घसरले आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवार च्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Web Title – नाफेडकडून कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त, बाजारभाव कोसळल्याने मोठा फटका, सद्यस्थिती काय? – Nashik News An atmosphere of anger has arisen among the farmers due to the suspension of onion procurement under NAFED, which was started in the budget session
