महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.

Image Credit source: tv9marathi
महाराष्ट्र : यंदा मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी (chilli farmers) चांगले दिवस येथील अशी अपेक्षा असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मिरची 30 रूपये किलो दराने मिरची विकली जात होती. जेमतेम शेतकरी आनंदी झाला होता. पण अनियमित पावसामुळे (unseasonal rain) मिरची पिकावरील फुलं गळून पडली आहेत. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.
नांदेडच्या एका शेतकऱ्याने उसाच्या पिकांत मिरचीचे आंतरपीक घेत दुहेरी उत्पन घेतलं आहे. नायगांव तालुक्यातील देगाव इथल्या उत्तम मोरे यांनी आपल्या दीड एकर जमिनीत हा प्रयोग केला आहे. पिकांची योग्य काळजी घेतल्याने आता ऊस पीकासोबत मिरचीचे पीक चांगलंच बहरलंय. बियाणे कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल तीस हजार रुपये दराने मिरची घेण्याचा करार केला आहे. त्यातून या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे उत्पन होणार आहे. त्यामुळे मोरे यांच्या सगळीकडे कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत
मालेगाव बाजारात फळांची वाढली आवक
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला असून उपवासाचा महिना असल्याने फळांना मागणी असून, मालेगाव बाजारात टरबूज,डाळिंब,चिकू, संत्रे, अंबा, अंजीर, खरबूजसह विविध फळांची आवक वाढली आहे. मालेगवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून फळांची आवक वाढल्याचे चित्र आहे. आंब्यासह पपई, टरबूज, मोसंबी, अननस या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उपवासाच्या काळात या रसदार फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते.
Web Title – अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात, मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून फळांची आवक वाढली – Chilli farmers in distress due to unseasonal rains, the market has seen an increase in the arrival of fruits for the last four days
