राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नाशिक, नंदुरबार, भंडारा, नांदेड येथील बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत.

नागपूर : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांच्या वतीने जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, लाखनी, पवनी आणि लाखांदूर या पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. मात्र, पाच बाजार समित्यांपैकी सर्वात श्रीमंत तुमसर बाजार समितीची निवडणूक अधिक चुरशीची आणि खर्चीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत येथील खरेदी-विक्रीचे नियमन होत असते. तांदळाबरोबर कडधान्य आणि गुळाचा तसेच जनावरांचा मोठा व्यापार या बाजार समितीअंतर्गत होतो. जवळपास दीड वर्षानंतर प्रशासकराज संपून बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापित व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले.
Web Title – राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका, इच्छुक उमेदवार लागले कामाला; कुठे काय परिस्थिती? – Election of market committees in the state announced
