तरुणांनी सध्या शेतीत बदल करुन लाखो रुपये कमावल्याच्या बातम्या कानावर पडतात, पण त्यामागे त्यांनी किती संघर्ष केलाय खरंतर हे जाणून घेण्यासारखं असतं. भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अनेकांनी कौतुक केलंय.

Image Credit source: tv9marathi
भंडारा : तीन एकर शेतात कारल्याची लागवड (Cultivation of bitter gourd ) करून शेतकरी (bhandara farmer) झाला लखपती झाला आहे. पारंपारीक शेतीला फाटा देत शेतकरी बागायती शेतीकडे करीत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अनेक तरुणांनी युट्यूब आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पिकांची माहिती घेऊन चांगली पीकं घेतली आहेत. त्याचबरोबर त्यांनी लोकांना आवाहन सुध्दा केलं आहे की, बागायती शेती करा. कारण पारंपारीक शेती (Agriculture News) शेतकरी करीत असल्यामुळे त्यातून मिळणार उत्पन्न हे अत्यल्प आहे. त्यातून अधिक मिळकत नसते. त्यामुळे सध्या अनेक तरुण शेतकरी बागायती शेती करताना दिसत आहेत. अवकाळी पावसाने (Unseasonal rain news) शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आपली व्यथा सरकारी दरबारी मांडत असल्याचं आपण विविध माध्यमातून पाहत आहोत.
तीन एकर शेतीत कारल्याची लागवड
कारले कितीही कडू असले तरी शेतकऱ्यांच्या उन्नतित किती गोडवा निर्माण केलाय याचे उदाहरण भंडारा जिल्ह्यात पहायला मिळाले. पारंपरिक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात येत असलेल्या खोलमारा येथील अमृत मदनकर यांनी तीन एकर शेतीत कारल्याची लागवड करीत लाखो रुपये कमावले आहेत.
दहा लाख रूपयाचे उत्पन्न घेतले
कधी अस्मानी, तर कधी सुल्तानी दुष्काळाच्या छायेत त्यांना पारंपारीक धानाची शेती करावी लागत होती. शेतकऱ्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा. मात्र या शेतकऱ्याने तीळमात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धानशेतीलाफाटा देत बागायती शेतीकडे वळून तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड करीत एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयाचे उत्पन्न घेतले. एवढेच नव्हे तर कारल्यासोबत काकडी, वाल्याच्या शेंगा चंदन, गाजर आणि इत्यादी पालेभाज्यांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतीशील शेतकरी अमृत मदनकर म्हणून त्यांचा गौरवसुद्धा केला आहे.
Web Title – Agriculture News : शेतात कारल्याची लागवड, चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्याला लाखो रुपये मिळाले – Agriculture News Cultivation of bitter gourd bhandara farmer success story
