विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान - 912 villages in Vidarbha affected by unseasonal rains, 26 farmers lost their crops - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान – 912 villages in Vidarbha affected by unseasonal rains, 26 farmers lost their crops

वाशिम (washim) जिल्ह्यातील ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान

unseasonal rain

Image Credit source: tv9marathi

अमरावती : एक आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह (unseasonal rain) गारपिटीचा पश्चिम विदर्भातील 912 गावांना फटका बसला आहे. या आपत्तीमुळे अमरावती (amravati rain update), यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील 26 हजार दोनशे शेतकऱ्यांच्या 20, 376 हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 16,737 क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित प्रक्रियेत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात ४,३१५ शेतकऱ्यांच्या ३,४०८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अकोला जिल्ह्यात ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात २,२५२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय वाशिम (washim) जिल्ह्यातील ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

शेतकर्‍यांना ९३१ कोटींचे पीक कर्ज वाटप

वर्धा जिल्ह्यात ६९ हजार शेतकर्‍यांना ९३१ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे. आतापर्यंत झालेल्या कर्जवाटपाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक कर्जाचे वाटप झाले. १५ मार्चपर्यंत ६९ हजार शेतकर्‍यांना ९३१ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेय. बहुतांश बँकांकडून चांगले वाटप केले आहे. बँक ऑफ इंडिया कर्ज वाटपात आघाडीवर असून बँकेने उद्दिष्टाच्या १५१ टक्के वाटप केले..

हे सुद्धा वाचा



रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटेमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील जवळपास ११ हजार शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला समोर जावे लागले आहे. जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून ज्या भागात पंचनामे झाले आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पीके आवरण्यास सुरुवात केली आहे.


Web Title – विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान – 912 villages in Vidarbha affected by unseasonal rains, 26 farmers lost their crops

Leave a Comment

Share via
Copy link