नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक शेतकरी सध्या भाव खाऊन जात आहे. अवकळी आणि गारपीटीचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला नसून लाखो रुपये कमवत असल्याने ते चर्चेत आले आहे.

Image Credit source: TV9 Network
नाशिक : एकीकडे अवकाळी चा फटका बसल्याने मोठ्या संख्येने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना दुसरीकडे मात्र कांदा बाजार भावातील मंदी लक्षात घेऊन येवला तालुक्यातील एका शेतकाऱ्याने किमया साधली आहे. येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने मिरची आणि कलिंगडाची आंतरपीक शेती करून शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची पिकाचे महत्व आणि मागणी लक्षात घेऊन शेततळ्याच्या पाण्यावर शेतमाल पिकवत लाखो रुपये कामविले आहे.
Web Title – संकटातही त्यानं मार्ग शोधला, लाखो रुपयांची केली कमाई, दुष्काळी भागातील शेतकऱ्याने साधली किमया – Nashik News Even in crisis, a farmer from Yewala in Nashik district has earned lakhs of rupees from his farm
