Agriculture News : आता राज्यात घेता येणार सफरचंदाचं पीक! जाणून घ्या कसं ते - Agriculture News Apple crop can now be taken in the up bihar punjab Find out how - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Agriculture News : आता राज्यात घेता येणार सफरचंदाचं पीक! जाणून घ्या कसं ते – Agriculture News Apple crop can now be taken in the up bihar punjab Find out how

राकेश ठाकूर, Tv9 मराठी

राकेश ठाकूर, Tv9 मराठी |

Updated on: Mar 23, 2023 | 8:30 PM

शास्त्रज्ञांनी नऊ वर्षांच्या संशोधन आणि चाचणीनंतर दोन वाण विकसित केले आहेत. विशेष बाब म्हणजे अन्ना आणि डोर्सेट गोल्डन सफरचंदच्या या जाती 35 ते 37 अंशांपर्यंत तापमानात सहज पीक देऊ शकतात.

Mar 23, 2023 | 8:30 PM

काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये सफरचंदाची सर्वाधिक लागवड होते. सफरचंद फक्त थंड प्रदेशातच घेतले जाते, असं आतापर्यंत आपल्याला माहिती आह. पण, आता उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि पंजाबसारख्या उष्ण राज्यांतील शेतकरीही सफरचंदाची लागवड करू शकतात. पारंपरिक पिकांच्या तुलनेत यात अधिक नफाही मिळेल.

पंजाब कृषी विद्यापीठाने सफरचंदाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. त्यामुळे उष्ण प्रदेशातही लागवड करता येईल. पंजाब कृषी विद्यापीठाने अन्ना आणि डोर्सेट गोल्डन नावाच्या सफरचंदाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत.

कृषी जागरणच्या माहितीनुसार, 9 वर्षांच्या संशोधन आणि चाचणीनंतर शास्त्रज्ञांनी या दोन्ही जाती विकसित केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अन्ना आणि डोर्सेट गोल्डन सफरचंदच्या या जाती 35 ते 37 अंशांपर्यंत तापमान सहन करू शकतात.

या दोन्ही जातींची पेरणी शेतकरी जानेवारी महिन्यात करू शकतात, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात. त्याचबरोबर मार्च ते जून दरम्यान हलके सिंचन करावे लागेल. तीन वर्षांनंतर मे महिन्यात तुम्ही त्यातून फळे काढू शकता. त्याची काढणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी.

पंजाब कृषी विद्यापीठ 2013 पासून सफरचंदावर संशोधन करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आतापर्यंत सफरचंदांच्या 29 जातींवर संशोधन केले आहे. या जातींची लागवड देशाबरोबरच परदेशातही सुरू झाली आहे.

Most Read Stories

Web Title – Agriculture News : आता राज्यात घेता येणार सफरचंदाचं पीक! जाणून घ्या कसं ते – Agriculture News Apple crop can now be taken in the up bihar punjab Find out how

Leave a Comment

Share via
Copy link