आधीच संतापजनक वक्तव्य करून शेतकऱ्यांचा रोष ओढून घेतलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची आणखी अडचण होणार आहे. त्यांच्याच मतदार संघातील एका शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे.

Image Credit source: Google
छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस, गारपीट यांसह शेतीमाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करून मेटकुटीला आला असून आता तो मृत्यूला जवळ करत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदार शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. असे असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात मतदार संघात एका शेतकरी दाम्पत्यानं आपले जीवन संपविले आहे. ज्या काळ्या मातीत राब-राब राबले त्याच काळ्या मातीत एकाने गळफास लावून तर एकाने विषारी औषध सेवन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
Web Title – कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात चाललंय काय? पाडव्याच्या दिवशीच शेतकरी दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल, राजकारण पेटणार? – chhatrapati sambhajinagar Agriculture Minister Abdul Sattar’s electorate Sangal farmer couple has taken an extreme decision
