कलिंगडाची लाली फिकी पडली, दोन एकरात लागवड; शेतकऱ्याच्या नशिबी काय? - Vast loss of Kalingada at Washim, traders wandered off to buy - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

कलिंगडाची लाली फिकी पडली, दोन एकरात लागवड; शेतकऱ्याच्या नशिबी काय? – Vast loss of Kalingada at Washim, traders wandered off to buy

गारपीट झाल्याने पिकांची नासाडी झाली. यात सापडला तो वाशिम येथील एक कलिंगड उत्पादक शेतकरी. त्यांनी दोन एकर जागेत कलिंगड लागवड केली होती.

वाशिम : राज्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. गारपीट झाल्याने पिकांची नासाडी झाली. यात सापडला तो वाशिम येथील एक कलिंगड उत्पादक शेतकरी. त्यांनी दोन एकर जागेत कलिंगड लागवड केली होती. पण, गारपिटीत हे कलिंगड वाया गेले. आता लाखमोलाचे कलिंगड फेकण्याची वेळ आली आहे. व्यापारी त्याचे कलिंगड खरेदी करण्यासाठी फटकतही नाही. त्यामुळे त्यांची विक्री कुठं करावी, असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे त्याने शेतातच गंजी मारून हे कलिंगड ठेवले. आता हे कलिंगड कुणी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे जनावरांना चारण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नाही.


Web Title – कलिंगडाची लाली फिकी पडली, दोन एकरात लागवड; शेतकऱ्याच्या नशिबी काय? – Vast loss of Kalingada at Washim, traders wandered off to buy

Leave a Comment

Share via
Copy link