बकरी विकत घेणाऱ्याला फोन करून घरी बोलवून घ्यायचे. त्याच्यासोबत सौदा करून ती बकरी त्याला विकायचे. एका बकरी मालकाची बकरी अशाच प्रकारे चोरी गेल्याची तक्रार दिली.

Image Credit source: tv9marathi
सुनील ढगे, नागपूर : चोरटे कधी कशाची चोरी करेल याचा नेम नाही, नागपुरमधील (Nagpur) पाचपावली पोलिसांनी (pachpavali police) कारचा वापर करून बकरी चोरणाऱ्या टोळीचा आणि ते विकत घेणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अजून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सगळे आरोपी हे कुख्यात गुन्हेगार (A notorious criminal) आहेत. बकरीची चोरी करणारे हे आरोपी आधी बकऱ्या कोणत्या परिसरात चरत आहेत याची रेकी करायचे. दुपारच्या वेळेस त्या ठिकाणी पोहोचायचे बकऱ्या चरताना दिसल्या की, त्यांना चारा द्यायचे. काही दाणे खायला घालायचे आणि जवळ आली की संधी साधून त्या बकरीला आपल्या आय ट्वेन्टी कार मध्ये कोंबून तिथून पोबारा करायचे.
बकरी विकत घेणाऱ्याला फोन करून घरी बोलवून घ्यायचे. त्याच्यासोबत सौदा करून ती बकरी त्याला विकायचे. एका बकरी मालकाची बकरी अशाच प्रकारे चोरी गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केलं असता त्यात एका आय ट्वेन्टी कार मधून येणाऱ्या तिघांनी बकरीला चारा खाऊ घालत कारमध्ये टाकून घेऊन गेल्याचं दिसलं.
कारच्या नंबरवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला असता, तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये दोन बकरी चोरणारे आहेत. तर एक विकत घेणारा आहे. पोलिसांनी यांची चौकशी केली असता त्यांनी याआधी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावरून अशाच प्रकारे कारमधून बकऱ्या चोरल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी एक आय ट्वेन्टी कार, एक बुलेट सह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपी फरार आहेत अशी माहिती विकास मनपिया
पोलीस उपनिरीक्षक पाचपावली पोलीस स्टेशन नागपूर यांनी दिली.
महत्त्वाचं म्हणजे पकडण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुन्हेगार असून एकावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो सध्या बेलवर बाहेर आहे, तर दुसरा हिस्ट्री सीटर आहे. या प्रकरणांमध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये बकरी चोर गँग सक्रिय झाली का
Web Title – Nagpur : नागपूरात आय ट्वेन्टी कार मधून बकरी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, आणखी गुन्हे उखल होण्याची शक्यता – A gang stealing goats from I20 cars in Nagpur is in police custody
