अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल - Unseasonal rain rots crops planted, farmers are desperate as moisture in the fields does not decrease - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल – Unseasonal rain rots crops planted, farmers are desperate as moisture in the fields does not decrease

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, पिकांसह आंबा, फळ पिकांचे नुकसान होणार आहे. धडगाव परिसरात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल

nandurbar farmer (1)

Image Credit source: tv9marathi

नंदुरबार : नंदुरबार (Nandurabar) जिल्ह्यात सलग सात दिवसापासून अवकाळी पाऊस (unseasonal rain) वादळी वाऱ्यांसह गारपीट सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीसाठी आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिके शेतात आडवी झाली आहेत. शेतीत केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर (Farmer) निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील ओल तशीच असल्याने आडवी झालेली पिके जागेवरच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावली असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा अक्कलकुवा शहादा आणि धडगाव जोरदार पाऊस होता आहे. जिल्ह्यात अजून काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या संप मिटला असून लवकरच पंचनामे पूर्ण होतील अशी अपेक्षा शेतकरी बांधव करू लागले आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात सरळ सलग आठवडाभर अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहर आणि तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची हजरी धडगाव येथे सोमवारी आठवडा बाजार भरत असल्याने अवकाळी पावसामुळे आठवडे बाजारात लागलेल्या दुकानांच्या चांगलाच नुकसान झाला आहे. तर अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ चांगलीचं उडाली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, पिकांसह आंबा, फळ पिकांचे नुकसान होणार आहे. धडगाव परिसरात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे. जळगाव तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना अवकाळी पावसामुळे पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचानंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आजही शेकडो आदिवासी महिला डाकीण प्रथेला बळी पडत आहेत. या आघोरी प्रथेमुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यातील सरी या गावात डकीन प्रथर्वर जनजागृती पोस्टर प्रदर्शन करण्यात आली. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाकीण महिलांना जादूटोणा जादूटोण्याचे घटना घडत आहेत. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील लोकांची समजूत काढण्यात आली असून डकीन ही प्रथा नाही आहे फक्त आपला भ्रम आहे.


Web Title – अवकाळी पावसाने आडवी पाडलेली पीके कुजवली, शेतातील ओल कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल – Unseasonal rain rots crops planted, farmers are desperate as moisture in the fields does not decrease

Leave a Comment

Share via
Copy link