आमच्या सारखा संघर्ष आणि दु:ख कुणाच्या वाट्याला नको यायला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेला कवडीमोल भावाने सुद्धा कोणी घेत नसल्याने द्राक्ष पंढरी हळहळली आहे.

Image Credit source: Google
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही ठिकाणी शेतमालाच्या नुकसानीची पंचनामा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही मिळणं अवघड झाले आहे. खरंतर खरीपाचे पीक मुसळधार पावसाने मातीमोल केलेले असतांना पुन्हा खरीपाचे पीक काढणीला आलेले असतांना अवकाळी पाऊस पडल्याने पुन्हा नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष उत्पादकाची परिस्थिती पाहिल्यास अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेतमालाची स्थिती पाहून बळीराजा रडकुंडीला आला आहे.
Web Title – 40 रुपयांनी सौदा झाला होता, आता 3 रुपयांनी सुद्धा कुणी घेईना; आमच्या सारखं कुणाच्या वाट्याला नको यायला, बळीराजा उद्विग्न – nashik news The grape growers had traded grapes for 40 rupees, but due to rains, it was time to sell them for 3 rupees
