Nangpur : हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसाने भुईसपाट, बळीराजाला सरकारी मदतीची अपेक्षा - Unseosonal Rain Nagpur all maharashtra crop demaged farmer tention - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Nangpur : हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसाने भुईसपाट, बळीराजाला सरकारी मदतीची अपेक्षा – Unseosonal Rain Nagpur all maharashtra crop demaged farmer tention

नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत.

Nangpur : हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसाने भुईसपाट, बळीराजाला सरकारी मदतीची अपेक्षा

nagpur-min

Image Credit source: tv9marathi

सुनील ढगे, नागपूर : नागपूर (Nangpur) जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस (Unseosonal Rain) झाला, तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांनाच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसाने भुईसपाट झालं आहे. आता बळीराजा सरकारी मदतीची अपेक्षा करीत आहे. नागपूर (Nagpur Rain) जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेडसह अनेक भागात काल गारपीट झाली. उभं असलेलं गव्हाचं हे पीक बघा अगदी भुईसपाट झालं. कापणीला आलेला गहू अक्षरशः झोपला. गहू जमिनीला लागल्याने तो खराब व्हायला लागला आहे. त्यामुळे गहू काळा पडून खराब होत असल्याने त्याला बाजारात भाव तर मिळत नाही. पण तो भरत सुद्धा नसल्याने त्याचे नुकसान होत आहे. गव्हाच्या पिका प्रमाणेच भाजीपाला पिकाच सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. कोबीतर अक्षरशः गारांच्या मारामुळे झाडालाच काळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनाच अतोनात नुकसान झालं असून आता शेतकरी मायबाप सरकारकडे मदतीची मागणी करत आहे .

नागपूर जिल्ह्यात संत्रा , कापूस, गहू, चना ही पीक आता हाताशी आली होती. या सगळ्या पिकांच गारपीटीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे विदर्भात पिकाचं १०० कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. फळबागा, संत्रा, हरभरा, गहू, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

हे सुद्धा वाचा



नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत. त्यामुळं या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. संत्र्याला आलेला आंबिया बहार गळून पडलाय. गारपीट मुळं झाडावर असलेला संत्रा अक्षरशः फुटला. आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय.


Web Title – Nangpur : हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसाने भुईसपाट, बळीराजाला सरकारी मदतीची अपेक्षा – Unseosonal Rain Nagpur all maharashtra crop demaged farmer tention

Leave a Comment

Share via
Copy link