गारांच्या पावसाने द्राक्ष बाग उद्ववस्त ; शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास हिरावला - solapur nanded Ahmadnagar nashik washim Unseosonal Rain Grapes crop destroyed - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

गारांच्या पावसाने द्राक्ष बाग उद्ववस्त ; शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास हिरावला – solapur nanded Ahmadnagar nashik washim Unseosonal Rain Grapes crop destroyed

अहमदनगरला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. गहू, मका, कांदे पालेभाज्या आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीन उध्वस्त झाले आहे.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसासह (Unseosonal Rain) गारपीट झाल्याने शेती पिकांचं नुकसान झालं आहे. राहाता तालुक्यातील राजुरी, ममदापूर परिसरात तर प्रचंड गारपीट झाल्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाजी दळे या शेतकऱ्याची तीन एकर द्राक्षबाग गारपिटीने उद्धवस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. दळे यांच्या बागेत द्राक्ष पिकाचा (Grapes crop) अक्षरशः सडा पडल्याचं विदारक चित्र दिसत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी शिवाजी दळे हवालदिल झालेत आहेत.

फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

अहमदनगरला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. गहू, मका, कांदे पालेभाज्या आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीन उध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर हात तोंडाशी आलेला पीक भुईसपाट झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये शेतीचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4500 शेतकरी हे बाधित आहेत आंबा ,पपई, टरबूज , कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. अचानक आलेल्या आपत्तीमुळे कृषी विभागातील संपकरी कर्मचारी हे पंचनामे करण्यासाठी कर्तव्यावर रुजू झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होणार आहे.

हे सुद्धा वाचारब्बी हंगामातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान होत आहे. या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा ,आष्टे , सुतारे, अजेपुर, हरिपूर, घोगळपाडा, अंबापुर या या गावांची पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.गावित यांनी यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.


Web Title – गारांच्या पावसाने द्राक्ष बाग उद्ववस्त ; शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास हिरावला – solapur nanded Ahmadnagar nashik washim Unseosonal Rain Grapes crop destroyed

Leave a Comment

Share via
Copy link