मागील चार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत तसेच शनिवारी व शुक्रवारी जिल्ह्यात गारपिटीनं प्रचंड थैमान घातल्यानं रब्बी गहू,हरभरा, कांदा,भाजीपाला पिकांसह निंबु,डाळिंब बागांचं अतोनात नुकसान झालंय.

Image Credit source: tv9marathi
विठ्ठल देशमुख, वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मालेगांव, मंगरुळपिर, रिसोड, मानोरा आणि कळंबा महाली,पांगरी नवघरे,जामदरा घोटी,वाई वारला,पांगरा बंदी,वनोजा,खिर्डा सह अनेक ठिकाणी शनिवारी रात्री दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळं शेकडो हेक्टर वरील डाळिंब,निंबु बागांसह कांदा,उन्हाळी मूग, रब्बी गहू,हरभरा, भाजीपाला या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने 600 हेक्टरच्यावर शेतातील पिकाचे नुकसान (crop demaged) झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाशिम तालुक्यातील कलंबा महाली येथील काल सायंकाळी झालेली वादळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांच्या मिर्ची, लसूण, कांदा,उन्हाळी मूग, रब्बी गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त याचे तात्काळ सर्व्ह करावे व मदत जाहिर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कलंबा महाली येथील शेतकरी सीताराम महाले याच्या शेतात दोन एकर मिर्चीची लागवड केली होती. ऐन तोडणीवर आलेल्या या मिर्ची पिकाचं काल सायंकाळी झालेल्या गारपिटीने अतोनात नुकसान झालं असून उभ्या मिर्चीच्या झाडाला पाने सुद्धा गळून पडले आहे. या पिकातून सीताराम महाले याना 50 हजार खर्च वगळता दोन ते अडीच लाख रुपयांच उत्पन्न होणार होतं. मात्र या गारपिटीने नुकसान झालं असून आम्हाला पंचनामे करून मदत करा असे शेतकरी सांगत आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. तर वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फलबागेचे नुकसान झाले. वादळीवाऱ्यामुळे झाडाचे लिंबू मोठ्या प्रमाणात खाली पडले. तसेच बीजवाई कांद्याचे पीकही खराब होत आहे. काही शेतकऱ्यांनचा गहु, हरभरा शेतात उभा असल्यामुळे पाण्याने गहू खराब होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनल ही खराब झाले आहे.
Web Title – वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची धांदल, शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता – Unseasonal rains in Washim district are farmers, farmers are likely to face financial crisis
