नांदेडमध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं, त्यामुळे शेतकरी रात्रभर शेतात काम करताना दिसतोय. हाताशी आलेलं गव्हाचे पीक वादळी वाऱ्याने आडवं पडून नुकसान होऊ नये, काळजी घेतली जात आहे.

Image Credit source: twitter
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पाहणी केलीय, आज मुदखेड तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात पालकमंत्री सर्व अधिकाऱ्यांना घेऊन दाखल झाले. मुदखेड तालुक्यातील कलिंगड (Watermelon), केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली. यावेळी भाजपचे इतर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागप्रमुख उपस्थित होते. दरम्यान आमचं सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देईल असे आश्वासन पालकमंत्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे.
केळीच्या बागांच मोठं नुकसान झालंय
नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीच्या बागांच मोठं नुकसान झालंय, रब्बी हंगामातील गह, ज्वारी, हरभरासह तब्बल वीस हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालं आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान हे केळी बागांचं झाल आहे. मुदखेड आणि अर्धापुर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. केळीचे उत्पन्न आता हातात यायची वेळ आली असताना वादळी वाऱ्याने होत्याच नव्हते झालं आहे.
अवकाळी पावसाने थैमान घातलं
नांदेडमध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं, त्यामुळे शेतकरी रात्रभर शेतात काम करताना दिसतोय. हाताशी आलेलं गव्हाचे पीक वादळी वाऱ्याने आडवं पडून नुकसान होऊ नये, काळजी घेतली जात आहे. नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव इथले हे दृश्य आहे. गावातील रामराव कोकाटे हे भूमिहीन असून इतरांची शेती कसून उदरनिर्वाह करतात. सध्या नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होत असून त्यातून नुकसान होऊ नये यासाठी चक्क दिवसरात्र गहू काढणीचं काम सुरु आहे अशी माहिती शेतकरी रामराव कोकाटे यांनी दिली.
Web Title – शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, गिरीश महाजन यांचं शेतकऱ्यांना आश्वासन – Farmers will be given maximum compensation, Girish Mahajan assured the farmers
