कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. दर शनिवारी होणाऱ्या मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुरदुरून व्यापारी यासाठी येथे दाखल होत आहे.

चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. दर शनिवारी होणाऱ्या मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुरदुरून व्यापारी यासाठी येथे दाखल होत आहे. 23 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. धान- कापूस -सोयाबीन यासाठी जिल्ह्यातील शेतकरी ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. राजुरा उपविभागात आणि वरोरा, भद्रावती या भागात उत्तम मिरची पीक घेतले जाते. मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने मिरचीचे बंपर उत्पादन होत आहे.
Web Title – येथील मिरची मार्केट तेजीत, परराज्यातील व्यापारी उतरले लिलावात; म्हणून मिरची उत्पादक शेतकरी समाधानी – Chilli market boom in Chandrapur Agricultural Produce Market Committee
