लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने फळबागांसह विविध पीक जमीनदोस्त, पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल - Washim Unseasonal Rain hail Malegaon rabi crop and cultivation destroyed - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने फळबागांसह विविध पीक जमीनदोस्त, पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल – Washim Unseasonal Rain hail Malegaon rabi crop and cultivation destroyed

जिल्ह्याच्या पिंपळसोंडा, कुत्त्तरडोह, अमानवाडी व वाई वारला इतर गावात बिजवाईकांदा, गहू, हरबरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्या शेतीचे पंचनामे करुन मदत जाहिर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने फळबागांसह विविध पीक जमीनदोस्त, पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल

washin rain

Image Credit source: tv9marathi

वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून वाशीम (Washim) जिल्ह्यात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात मालेगाव (Malegaon) तालुक्यातील पांगराबंदी गावाला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. लिंबाच्या आकाराच्या गाराने परिसर बर्फ साचल्यागत पांढराशुभ्र झाला होता.या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील लिंबू, डाळिंब, संत्र्याच्या फळबागा उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, बिजवाई कांदा, भाजीपाला, टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पांगराबंदी येथील ताईबाई जनार्धन घुगे या महिला शेतकऱ्यांच्या दोन एक्कर तोडणीस आलेली लिंबू फलबाग गारपिटीने नष्ट झाली आहे. तर सुभाषराव बुद्धिवंत यांच्या अडीच एक्कर शेतातील ७० ते ८० झाडं पूर्णपणे उन्मळून पडली आहेत. अनिल बुद्धीवन्त ह्या शेतकऱ्यांची पाच एक्कर लिंबू फळबाग उध्वस्त होऊन १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतकरी रवींद्र बगाडे यांचा दोन एकर दाळींबाचा बगीचा गारपीटीने उध्वस्त झाला आहे. मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे रात्री साडेआठच्या सुमारास हरिचंद्र काळू महाजन यांच्या घरावरची तीन पत्रे उडून गेली आहेत.

मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील रवींद्र बगाडे यांनी तीन वर्षांपासून जोपासलेल्या दोन एकर डाळिंब बागेचे कालच्या गारपीटीमुळे उध्वस्त झाली असून जवळपास 16 लाख रुपये खर्च केला होता. मात्र काल झालेल्या अपेक्षित उत्पन्न 7 लाख होणार होता. गारपिटीने 7 लाखाचे नुकसान झाले आहे. गारपीट इतकी भयंकर होती, मागील 16 तास उलटून सुध्दा या बागेतील गारा अद्याप दिसून असल्यामुळे लिबाच्या आकाराची गारा दिसून आल्याच्या रवी बगाडे आणि भावना बगाडे दिसून आल्या.

हे सुद्धा वाचा



वाघळुद येथील शेतकर्‍याच्या सौरपॅनलचे नुकसान, उन्हाळ्याच्या तोंडावर गहू, हळद, करडीचे पिक काढणीला आलेलं असताना, त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक आलेला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. शेतात लावलेल्या सौरउर्जा पॅनललाही मोठा तडाखा बसत आहे. मालेगाव तालुक्यातील वाघळुद येथील महिला शेतकरी गंगाबाई विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गंगाबाईने पीएम कुसुम योजनेअंतर्गत आपल्या शेतात जुन्ना सोलर कंपनीचे सौर पंप व पॅनल आपल्या शेतात बसविले होते. मात्र वादळी वारा व गारपीटीमुळे या सौरपॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे पॅनल गाराच्या तडाख्यात सापडून ठिकठिकाणी फुटले आहे. तालुक्यात अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांपुढे नवे आव्हान उभे ठाकले असल्याचं ताईबाई घुगे यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या पिंपळसोंडा, कुत्त्तरडोह, अमानवाडी व वाई वारला इतर गावात बिजवाईकांदा, गहू, हरबरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्या शेतीचे पंचनामे करुन मदत जाहिर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


Web Title – लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने फळबागांसह विविध पीक जमीनदोस्त, पीक आडवं झाल्याचं पाहून शेतकरी हवालदिल – Washim Unseasonal Rain hail Malegaon rabi crop and cultivation destroyed

Leave a Comment

Share via
Copy link