अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी - Unseasonal Rain in maharashtra nandurbar dhule amravati rabi season crop destroyed - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी – Unseasonal Rain in maharashtra nandurbar dhule amravati rabi season crop destroyed

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी

Unseasonal Rain

Image Credit source: tv9marathi

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा धडगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या चांगलाचं फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील (rabi season) गहू, मका, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झालं आहे. तर त्यासोबत फळबागातील पपई, केळीचे, खरबूज, आणि टरबूज देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पंचनामे करून शासन तात्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र कर्मचारी संपर्क गेले असल्यामुळे शासनाला पंचनामे आकडेवारी कशी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे शासनाने कागदांची वाट न पाहता शेतकरीराजाला त्वरित मदत करावी एवढी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (Farmer News) करू लागले आहेत.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सिंदबन, छडवेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून, अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे गहू, मका, हरभरा, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पपई आणि केळीच्या फळबागांनाही याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा



कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साखरी तालुक्यातील सिंदमान छडवेल या परिसरात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे या भागातला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अवघ्या दहा दिवसात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गारपीटीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.


Web Title – अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी – Unseasonal Rain in maharashtra nandurbar dhule amravati rabi season crop destroyed

Leave a Comment

Share via
Copy link