Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच - Washim unseasonal rain Agricultural news crop destroyed farmer - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच – Washim unseasonal rain Agricultural news crop destroyed farmer

विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील शेवटचे गाव पांगराबंदी येथील शेतकरी बगाडे यांचा दोन एकर डाळिंबाचा बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे.

Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच

unseasonal rain

Image Credit source: tv9marathi

वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून वाशीम (Washim) जिल्ह्यात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे. आजही जिल्ह्यातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावाला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. बोराच्या आकाराच्या गाराने परिसर पांढराशुभ्र झाला होता. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मागच्या आठदिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पावसाने रब्बी (rabi season) पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल

या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील फळबाग उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, भाजीपाला, प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. काल सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली असल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात अनेक भागात पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले

विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील शेवटचे गाव पांगराबंदी येथील शेतकरी बगाडे यांचा दोन एकर डाळिंबाचा बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे लक्ष सरकारी मदतीकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचावीजेच्या अनेक घटना घडल्या आहेत

मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे रात्री साडेआठच्या सुमारास हरिचंद्र काळू महाजन यांच्या घरावरची टिन पत्रे अवकाळी पावसाने उध्वस्त झाली आहेत. राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसात वीजेच्या अनेक घटना घडल्या आहेत.


Web Title – Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच – Washim unseasonal rain Agricultural news crop destroyed farmer

Leave a Comment

Share via
Copy link