नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

Image Credit source: Google
नाशिक : द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकल बाजार आणि परदेशात निर्यात होत असते. मात्र, मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने मोठा शेतकऱ्यांना बसला. अशातच पुन्हा अवकाळी पाऊस पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा दोन दिवसांपासून मध्यरात्री मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आधीच द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागलेला असतांना लोकल बाजारात द्राक्षाकडे कुणी बघायला सुद्धा तयार नाहीये. त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला द्राक्षाचा मनुका करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
Web Title – द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना किती कोटींचा फटका, द्राक्ष पंढरी धास्तावली – nashik news 12 crore hit due to drop prices of grapes bangladesh tax per kg gets less 20 rupees
