Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला फटका, पण या जिल्ह्यात प्रति क्विंटल अकराशे रुपयांचा भाव - Onion growers were hit by unseasonal rains, but the price per quintal in this district is Rs.1100 - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला फटका, पण या जिल्ह्यात प्रति क्विंटल अकराशे रुपयांचा भाव – Onion growers were hit by unseasonal rains, but the price per quintal in this district is Rs.1100

नाशिक भागातील कांदा नांदेडच्या बाजारात येण्या आगोदर स्थानिक शेतकरी कांदा काढून बाजारात नेण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात दिसतंय.

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : कांद्याने (onion crop) यंदा ‘वांदा’ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला असताना, नंदुरबार जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गाव असलेल्या सैताने गावातील शेतकऱ्यांना गारपीठ आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. कांद्याला भाव मिळत नसताना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या कांद्याचा उत्पादन खर्च निघणार नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आसल्याचे सांगितले जात आहे.

कांद्याला प्रति क्विंटल सातशे ते अकराशे रुपयांचा भाव

राज्यातील कांद्याच्या मुख्य बाजारपेठेत कांद्याच्या भावावरून वांधे सुरू आहेत. पण इकडे नांदेडमध्ये सध्या कांद्याला प्रति क्विंटल सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे लासलगावचा कांदा येण्यापूर्वी हा भाव मिळवण्यासाठी नांदेडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढणीत व्यस्त झाला आहे. नाशिक भागातील कांदा नांदेडच्या बाजारात येण्या आगोदर स्थानिक शेतकरी कांदा काढून बाजारात नेण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात दिसतंय.

नाफेड मार्फत प्रथमच लाल कांद्याची खरेदी

कांद्याचे बाजार भाव 2 ते 4 रुपये किलोपर्यंत कोसळल्यानंतर हवालदील झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत प्रथमच लाल कांद्याची खरेदी शेतकरी प्रोडूसर कंपन्या मार्फत 27 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 870 रुपये इतका तर दररोज वाढत पंधरा दिवसात 1048 रुपये इतका बाजार भाव देण्यात येत आहे. कागदपत्रांच्या अटी व शर्तींमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

हे सुद्धा वाचासध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. रबी पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहेत.


Web Title – Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला फटका, पण या जिल्ह्यात प्रति क्विंटल अकराशे रुपयांचा भाव – Onion growers were hit by unseasonal rains, but the price per quintal in this district is Rs.1100

Leave a Comment

Share via
Copy link