बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. दुसऱ्यांदा आलेल्या या संकटात शेतकरी कसा उद्ध्वस्त झालाय हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

Image Credit source: Google
नाशिक : हवामान विभागाने जसा अंदाज सांगितला तसा राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाच्या दरम्यान काही ठिकाणी गारपीठ झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळेला हा अवकाळी पाऊस येऊन कोसळल्याने शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रीच्या वेळेला शेतातील चित्र वेगळे होते. मात्र, सकाळी उठून बघताच शेतमालाचा अक्षरशः चिखल झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या नुकसानीची मदत सोडाच पंचनामेही झालेले नसतांना आता दुसऱ्यांदा अवकाळी पाऊसाचे संकट कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
Web Title – जे नको व्हायला हवं होतं तेच झालं, अवकाळीने शेतकऱ्याला केले उद्ध्वस्त; शेतकऱ्याला आता कोण वाचणार? – nashik news Untimely rains destroyed the farmer for the second time after the first loss was not helped
