Agriculture News : बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात, अजून दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज - Agriculture News Nandurbar Farmer Ramadan 2023 banana crop increase in the demand of banana in the market - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Agriculture News : बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात, अजून दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज – Agriculture News Nandurbar Farmer Ramadan 2023 banana crop increase in the demand of banana in the market

केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील डॉ. मधुकर पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात दहा एकर मध्ये केळी लावली असून, दहा एकरात २० हजार खोड लावली एका केळी खोडाला १०० रुपये पर्यंत खर्च येत असल्याची माहिती सांगितली आहे.

Agriculture News : बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात, अजून दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

banana crop

Image Credit source: tv9marathi

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रातून (Maharashtra) मोठ्या प्रमाणात केळीची (Banana Crop) निर्यात केली जाते. मात्र केळीला चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर होता. रमजान महिना (Ramadan 2023) येत असल्याने उत्तर भारतातील आणि अनेक देशातील केळीची मागणी वाढली असल्याने भाव देखील चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Nandurbar Farmer) आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे केळीची कॉलिटी चांगली असल्याने दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रमजान महिना आणि इतर सणांमुळे केळीची मागणी अधिक वाढली आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला आहे.

एका झाडापासून १००० ते १८०० रुपये उत्पादन

उत्तर महाराष्ट्रातील केळी भारतातच नव्हे, तर विदेशात देखील पाठवली जात असते. मात्र गेल्या काही हंगामापासून केळीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नव्हता. यावर्षी केळीची आवक कमी असल्याने, रमजान महिना आणि इतर सणांमुळे केळीची मागणी अधिक वाढली आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील डॉ. मधुकर पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात दहा एकर मध्ये केळी लावली असून, दहा एकरात २० हजार खोड लावली एका केळी खोडाला १०० रुपये पर्यंत खर्च येत असतो. तर एका झाडापासून १००० ते १८०० रुपये उत्पादन येत आहे. कोरोना काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले होते. मात्र आता मिळणाऱ्या चांगल्या दरांमुळे नुकसान भरून निघत आहे अशी माहिती डॉ मधुकर पाटील यांनी सांगितली. त्याची केळीची शेती आहे.

हे सुद्धा वाचा



या कारणामुळे दर वाढणार…

बाजारपेठेत केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मात्र पुरवठा कमी असल्याने परदेशातही मागणी वाढल्याने आगामी काळात येणाऱ्या रमजान व इतर सण उत्सवामुळे केळीचे दर अजूनही वाढतील असा अंदाज राजू पाटील या व्यापाऱ्याने व्यक्त केला. विविध कारणांमुळे यावर्षी केळीच्या उत्पादनात घट झाली आहे आणि बाजारपेठेत मागणी कायम असल्याने केळीचे दर कमी होणार नसल्याचा अंदाज आहे.


Web Title – Agriculture News : बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात, अजून दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज – Agriculture News Nandurbar Farmer Ramadan 2023 banana crop increase in the demand of banana in the market

Leave a Comment

Share via
Copy link