बाजार भाव नसल्याने डांगर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. डांगर आणि टरबूजला प्रति किलो तीन ते पाच रुपयाचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीची प्रचिती नंदुरबार जिल्ह्यातील डांगर आणि टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना येत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि डांगर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळांना तडे जात असून शेतकऱ्यांना फळे फेकल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. असं प्रफुल पाटील यांनी आपली व्यथा सांगितली.
Web Title – वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले; या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री – Nandurbar Farmers Watermelons and melons fell in the stormy rain
