कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लहान मुलांना जोपासतो त्या तुलनेत जपून वाढविलेल्या पिकाला बाजारेठांमध्ये विरक्रिसाठी गेल्यावर लागणार खर्च देखील निघत नसल्याने सरकारने त्याकडे लक्ष घालण्याची मागणी मालेगावातील शेतकरी करीत आहेत.
Web Title – निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक – Market price crisis on onion and tomato farming producers Financial crisis on farmers in Ahmednagar Nashik, Lasalgaon
