सलग तिसऱ्या दिवशीही बळीराजाला फटका, उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी गारांचा पाऊस - For the third consecutive day, unseasonal rains have caused heavy losses to farmers and their crops have been destroyed - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

सलग तिसऱ्या दिवशीही बळीराजाला फटका, उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी गारांचा पाऊस – For the third consecutive day, unseasonal rains have caused heavy losses to farmers and their crops have been destroyed

कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटात बळीराजा वारंवार अडकू लागला आहे. अवकाळी पावसाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही बळीराजाला फटका, उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी गारांचा पाऊस

Image Credit source: Google

नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातले आहे. गेल्या तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील ( North Maharashtra )  काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान ( Farmer Loss )  झालेलं आहे. यंदाच्या वर्षी खरीप पिकांनी देखील शेतकऱ्यांचा घात केला होता, नैसर्गिक आपत्तीने खरीप पीक बळीराजाच्या हातून निघून गेले होतं. त्यामुळे रब्बी पीक शेतकऱ्यांना तारून नेईल अशी स्थिती होती. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक ही अवकाळी पावसाने हिरावून घेतलंय. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था बिकट झाली आहे.


Web Title – सलग तिसऱ्या दिवशीही बळीराजाला फटका, उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी गारांचा पाऊस – For the third consecutive day, unseasonal rains have caused heavy losses to farmers and their crops have been destroyed

Leave a Comment

Share via
Copy link