राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून लवकर मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

Image Credit source: Google
मुंबई : राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे ( Farmer News ) मोठे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामध्ये सरकारी मदतीची अपेक्षा असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दखल घेतली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
Web Title – अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश काय ? – Chief Minister’s instructions to immediately conduct Panchnama of farmers’ fields affected by unseasonal rains
