नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या धक्क्यातून सावरत असतांना रब्बीने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.

Image Credit source: Google
शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : सोमवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा पाहायला मिळाला. मात्र, इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसाने ( Unseason Rain ) होत्याचे नव्हते केले आहे. रब्बीच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. रब्बी हंगामासह काढून ठेवलेला शेतमाल देखील यामध्ये भिजून त्याचा चिखल झाल्याने तोंडचा घास गेल्याची परिस्थिती बळीराजाची झाली आहे. गारांचा पाऊस झाल्याने शेतात असलेला शेतमाल सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने घातलेले हे थैमान बळीराजाच्या डोळ्यात अश्रु आणणारे आहे.
Web Title – इगतपुरीत गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांसह बळीराजाच्या स्वप्नांचा झाला चिखल – In the villages of Igatpuri taluka of Nashik, the snow rains have been rained and the farmers have suffered major damage.
