या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग - Chandrapur Construction of bamboo cross barriers on this route; The first experiment in the country was conducted here - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग – Chandrapur Construction of bamboo cross barriers on this route; The first experiment in the country was conducted here

निलेश डाहाट

निलेश डाहाट | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Mar 06, 2023 | 2:12 PM

बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे.

या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग

चंद्रपूर : गडचिरोली, चंद्रपूर भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन होते. बांबू हा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. त्यामुळे या बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. रस्त्याच्या बाजूल बॅरिअर म्हणूनही आता बांबूचा वापर केला गेला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बांबू क्रास बॅरिअरबाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रास बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाच्या परिसरात या बांबू क्रास बॅरिअरची उभारणी करण्यात आली आहे. एरवी देशभर महामार्गाच्या बाजूला स्टील मिश्रित क्रास बॅरिअरची उभारणी केली जाते. मात्र बांबूचा वापर करून क्रास बॅरिअरची उभारणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


Web Title – या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग – Chandrapur Construction of bamboo cross barriers on this route; The first experiment in the country was conducted here

Leave a Comment

Share via
Copy link