Agriculture News : सिमला मिरची उत्पादक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत, 70 टक्के उत्पादनात घट होणार - Agriculture News Capsicum Black Thrips Thrips parvispinus Nandurbar farmer - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Agriculture News : सिमला मिरची उत्पादक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत, 70 टक्के उत्पादनात घट होणार – Agriculture News Capsicum Black Thrips Thrips parvispinus Nandurbar farmer

देशात विविध राज्यात सिमला मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’ (Thrips parvispinus) असे आहे. ओळख फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे.

Agriculture News : सिमला मिरची उत्पादक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत,  70 टक्के उत्पादनात घट होणार

SHIMALA MIRACHI

Image Credit source: tv9marathi

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : ढोबळी मिरची (Capsicum) वर ‘ब्लॅक थ्रीप्स’ (Black Thrips) रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे उघडकीस आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कलर कॅप्सिकम आणि कॅप्सिकम उत्पादक अर्थात सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उध्वस्त झाला असून त्यांनी टाकलेला खर्चही निघणार नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे.महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा विभागामध्ये आणि राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’ (Thrips parvispinus) असे आहे.

दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती

देशात विविध राज्यात सिमला मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’ (Thrips parvispinus) असे आहे. ओळख फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे. ही प्रजाती भारतामध्ये सन 2015 प्रथम पपई या पिकावर व त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती.

ढोबळी मिरची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान

मिरची, ढोबळी मिरची, पपई, वांगी, बटाटे व फूलपिके या पिकांवरती प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भावामुळे मिरचीची फळे खराब होत आहेत. उत्पादनात प्रचंड घट येत असते ब्लॅक थीप्समुळे ढोबळी मिरची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी मिरचीची पिके काढून फेकत आहेत, प्रादुर्भाव वाढला असून मिरची उत्पादनात प्रचंड अशी घट आली आहे, एकरी दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खर्च केला असला तरी त्यांच्या हाती तितकेही उत्पादन येणार नसल्याची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा



राज्यातील मिरचीच्या क्षेत्र वाढीला चालना मिळेल

मिरची पिकावर दरवर्षी नवनवीन रोग येत असतात, मिरची पिकावरील रोगांवर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र असे मिरची संशोधन केंद्र उभारण्यात यावी आणि नवनवीन संशोधन करून विषाणूजन्य आणि किडजन्य रोगांवर उपाययोजनांसाठी संशोधन झाल्यास त्यातूनच राज्यातील मिरचीच्या क्षेत्र वाढीला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया विलास पाटील यांनी दिली.


Web Title – Agriculture News : सिमला मिरची उत्पादक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत, 70 टक्के उत्पादनात घट होणार – Agriculture News Capsicum Black Thrips Thrips parvispinus Nandurbar farmer

Leave a Comment

Share via
Copy link