महिंद्र THAR ने शेत नांगरले, लोक म्हणाले प्लीज असे नको करू ? ट्रॅक्टर कोण घेणार ! - Mahindra THAR plowed the field, people said please don't do this? Who will buy the tractor? - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

महिंद्र THAR ने शेत नांगरले, लोक म्हणाले प्लीज असे नको करू ? ट्रॅक्टर कोण घेणार ! – Mahindra THAR plowed the field, people said please don’t do this? Who will buy the tractor?

एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरण्याऐवजी चक्क आलीशान महिंद्र थारचा वापर केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर खूपच शेअर होत आहे.

महिंद्र THAR ने शेत नांगरले, लोक म्हणाले प्लीज असे नको करू ? ट्रॅक्टर कोण घेणार !

THAR

Image Credit source: socialmedia

नवी दिल्ली : कोण्या एके काळी महागडी रोल्स रॉयस कार खरेदी करताना राजाचा अपमान केला होता. म्हणून त्याने या गाड्यांद्वारे आपल्या भारतात फारच हलकी कामे केल्याने त्या कंपनीला नाक घासत यावे लागल्याची कथा तुम्हाला माहिती असेलच.. परंतू असाच काहीसा किस्सा महिंद्रची आलीशान एसयुव्ही थारच्या ( Mahindra Thar ) बाबतीत घडला आहे. परंतू ही किस्सा महिंद्रचा अपमान करण्यासाठी  नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी घडला आहे.

महिंद्रची दमदार थार सध्या सगळ्यांची पसंदीची कार आहे. या आलिशान कारने कोणी शेत नांगरल्याचे कधी ऐकीवात आहे का ? महिंद्रची दमदार थारने रस्त्यावर जाताना पाहिली तरी लोक तिच्याकडे वळून पहातातच. या कारने रस्ता कसाही असला तरी प्रवास आरामदायीच होत असतो. मजबूत आणि सुंदर असा दोन्हीचा संगम असलेल्या महिंद्र थार चा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे. त्यात महिंद्रच्या थारने नविनच कारनामा केला आहे. या कारद्वारे एकाने आपले शेत नांगरल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत आहे. या व्हिडीओत ट्रॅक्टर नसल्याने महिंद्रच्या थारला थेट नांगराला जोडण्यात आले आहे. या व्हिडीओचा खूपच बोलबोला झाला आहे. काही युजरनी या व्हिडीओवर आता महिंद्रची ही गाडी कोणी घेणार नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत या व्यक्तीने थारला रोटोवेटरशी जोडले आहे. आणि बिनधास्त शेत नांगरल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओला गेल्यावर्षी डिसेंबरला इंस्टाग्राम हॅंडल arunpanwarx ने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला 40 हजाराहून अधिक लाईक्स झाल्या आहेत. तर 2 लाख 60  हजार व्यूज मिळाले आहेत. महिंद्र थारने शेत नांगरल्याने आता ट्रॅक्टर कोणी घेणार नाही पासून ते आता थार कोणी घेणार नाहीत अशा प्रतिक्रीया या व्हिडीओला आल्या आहेत. एकाने म्हटले आहे की अरे बाबा तू तर थारलाच ट्रॅक्टर बनविले. काही म्हटले आहे की थारचे इंजिन पण म्हणत असेल की अरे भाई बच्चे की जान लेगा क्या ?Web Title – महिंद्र THAR ने शेत नांगरले, लोक म्हणाले प्लीज असे नको करू ? ट्रॅक्टर कोण घेणार ! – Mahindra THAR plowed the field, people said please don’t do this? Who will buy the tractor?

Leave a Comment

Share via
Copy link