Red onion : या कारणामुळे कांदा उत्पादक संकटात, सरासरी प्रति क्विंटलमागे १३०० रुपये नुकसान - Red Onion: Onion producing crisis in crisis for this reason, loss of Rs 5 per quintal per quintal - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Red onion : या कारणामुळे कांदा उत्पादक संकटात, सरासरी प्रति क्विंटलमागे १३०० रुपये नुकसान – Red Onion: Onion producing crisis in crisis for this reason, loss of Rs 5 per quintal per quintal

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. यावर्षी फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव कोसळण्यावर झाला आहे.

नाशिक : राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन अधिक झाल्याने महाराष्ट्रातील (maharashtra) कांद्याच्या मागणीत देशांतर्गत घट झाली आहे. त्याचाही थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे चित्र समोर आले आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Income Market Committee) गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा 3 लाख क्विंटल लाल कांदा (Red onion) आवक जास्त विक्रीसाठी दाखल झाला आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. यावर्षी फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव कोसळण्यावर झाला आहे. गेल्या वर्षी फेबुवारी महिन्यात ९ लाख क्विंटल लाल कांद्याला जास्तीतजास्त ३११५ रुपये, कमीतकमी ५०० रुपये, तर सरासरी २१३३ रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळत होता. यंदा फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार लाल कांद्याची आवक झाली जास्तीत जास्त १६०० रुपये, कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ८४० रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटलमागे १३०० रुपये नुकसान झाल्याने अंदाजे १५१ कोटी ४५ लाख रुपयांचा एकट्या लासलगाव बाजार समिती विक्री झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादकांना फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचागेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे, संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवून दहा तास आंदोलन केले होते. यानंतर मंगळवार आणि आज बुधवारी कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू असून लासलगाव बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल विक्रीसाठी आलेल्या कांद्याला जास्तीजास्त 1131 रुपये, कमीतकमी 350 रुपये तर सरसरी 700 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे. मात्र या बाजार भावातून शेतातून काढण्यासाठी लागणारी मजुरी आणि वाहतूक खर्च कुठेतरी निघत आहे. पण केलेले उत्पादन खर्च निघणे मुश्किलचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.


Web Title – Red onion : या कारणामुळे कांदा उत्पादक संकटात, सरासरी प्रति क्विंटलमागे १३०० रुपये नुकसान – Red Onion: Onion producing crisis in crisis for this reason, loss of Rs 5 per quintal per quintal

Leave a Comment

Share via
Copy link