लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढलं, पण तरी सुध्दा शेतकरीवर्ग चिंतेत - The production of red pepper has increased by 60 percent, but still the farmers are worried - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढलं, पण तरी सुध्दा शेतकरीवर्ग चिंतेत – The production of red pepper has increased by 60 percent, but still the farmers are worried

आणखी काही दिवस मिरचीच्या हंगाम सुरू राहणार असून अजून मिरचीची आवक राहणार असल्याने मागील वर्षाचे तुलना यावर्षी मिरचीचे चांगली राहिली होती.

लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढलं, पण तरी सुध्दा शेतकरीवर्ग चिंतेत

red chilli

Image Credit source: tv9marathi

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी बाजार समितीत (Market) सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती. पण यंदा २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढलं आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मिरचीला (red chilli) चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी यंदाही अधिक क्षेत्रात मिरचीची लागवड केली. तर त्या सोबतच पोषक हवामान असल्याने मिरचीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. या हंगामात मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर काही प्रमाणात मिरचीच्या दरात घसरण झाली होती. तरी देखील आतापर्यंत दोन लाख क्विंटल पेक्षा अधिक मिरचीची आवक बाजारपेठेत झाली असल्याने साठ टक्के मिरची अधिक बाजारपेठेत (Market rate) दाखल झाली आहे. आणखी काही दिवस मिरचीच्या हंगाम सुरू राहणार असून अजून मिरचीची आवक राहणार असल्याने मागील वर्षाचे तुलना यावर्षी मिरचीचे चांगली राहिली होती.

कांद्याला अवघ्या चार ते पाच रुपये भाव मिळत आहे

रब्बी हंगामातील पिकांना चांगला हमीभाव मिळावे खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळणार का असाच काहीसा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित झाला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, आणि मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. आवक वाढल्याने दरात घसरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. तशी परिस्थिती रब्बी हंगामातील पिकांवर होणार का काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रब्बी हंगामातील कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र कांद्याला अवघ्या चार ते पाच रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे केलेला खर्च देखील निघणार नसते याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे. त्यासाठी शासनाने या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाला आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी इतर प्रश्नांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्न देखील गांभीर्याने घेऊन मार्ग लावला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

धुळे जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या भावात कापूस विकायला सुरुवात केली आहे. 8 गाजर क्विंटल पेक्षा अधिक कापसाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार हस्तक्षेप करत नसल्याबद्दलही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कापसाला किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. गेल्या वर्षी हा दर 12 ते 13 हजार पर्यंत गेला होता. यावर्षी मात्र दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी चिंता तूर आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी शासनाने पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं एका शेतकऱ्याने सांगितले आहे.


Web Title – लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढलं, पण तरी सुध्दा शेतकरीवर्ग चिंतेत – The production of red pepper has increased by 60 percent, but still the farmers are worried

Leave a Comment

Share via
Copy link