सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा असल्याने शेतीसाठी पाणी अन् पंपासाठी वीजही अत्यावश्यक आहे. परंतु महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकर्यांचे कंबरडे मोडले.

सांगली : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. काही शेतकऱ्यांना चुकीची बील देण्यात आली. त्यामुळे शेतकरी संतापले. काही जणांचे वीजबिल थकीत आहेत. त्यांची वीज कापण्याचं काम कार्यकारी अभियंता यांच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून थकीत असलेल्या वीजबिलाचे कारण देत वीज कापण्याचे काम सुरू आहे. यामुळे शेतकरी संतप्त झालेत. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. पीक झाले नाही तर शेतकऱ्यांना काय मिळणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी नेहमी वाचा फोडत असते. विधिमंडळाच्या अधिवेशनातही कांद्याच्या भावावरून रणकंदन माजलं आहे. इकडं वीज कनेक्शन कापू नये म्हणून शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Web Title – कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक का? – Stopped in front of Executive Engineer’s office; Why are self-respecting farmers’ organizations aggressive?
