आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे.

नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून बसला आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळणार का असं काहीसं प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे. तर मिरचीला ३ हजारांपासून तर ५ हजार ५०० भाव आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून आहे.
Web Title – अधिवेशनाकडून बळीराजाला अपेक्षा काय?; रब्बी पिकांना चांगला भाव मिळावा – What does Baliraja expect from the convention?; Rabi crops should fetch good prices
