शासनाने २७ फेब्रुवारीपासून नोंदणी करण्याचा जीआर काढला. परंतु, लेखी आदेश आले नाहीत. त्यामुळे आजपासून नोंदणी करण्यात आली नाही. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी केलेली गर्दी
अमरावती : अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासांपासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या. मात्र अचानक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने तारांबळ उडाली. अखेर नोंदणी प्रक्रिया केंद्राला बंद करावी लागली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी उसळली. २४ तासापासून शेतकरी रांगा लावूनही नोंदणी झाली नाही. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा लागला. अचानक गर्दी वाढल्याने नोंदणी बंद करावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. वाढत्या शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खरेदी विक्री व्यवस्थापक मारोती बोकडे यांनी दिली. अचानक नोंदणी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश केला. जय जवान जय किसान नारेबाजी करीत प्रशासनावर रोष व्यक्त केला.
Web Title – २४ तासांपासून रांगा लावून उपयोग नाही; धामणगावात शेतकरी का झालेत आक्रमक? – No use queuing for 24 hours; Why have farmers become aggressive in Dhamangaon?
