यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

सोलापूर : ५१२ किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता शेतकऱ्याला दोन रुपयाचा धनादेश देणे अडत व्यापाऱ्याच्या अंगलट आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूर्या ट्रेडिंगचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी दहा पोती कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला होता. त्या मोबदल्यात एक रुपया प्रति किलोप्रमाणे 512 रुपये रक्कम झाली. मात्र हमाली, तोलाई इत्यादी आकारणीनंतर केवळ दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले. या दोन रुपयांचा धनादेश अडत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिले होते. यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
Web Title – कांदा उत्पादकाला दोन रुपयांचा धनादेश देणाऱ्या अडत व्यापाऱ्यावर कारवाई काय?; इतक्या दिवसांसाठी परवाना निलंबित – What action should be taken against the trader who gave a check of two rupees to the onion producer?; License suspended for so many days
