Nashik : गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, मशिनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे कल - Farmers' rush to harvest wheat, trend towards mechanized wheat harvesting - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Nashik : गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, मशिनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे कल – Farmers’ rush to harvest wheat, trend towards mechanized wheat harvesting

अर्ध्या तासात एक एकर गहू काढला जात असल्याने हार्वेस्टर मशिनला मागणी वाढली असून एकरी दोन हजार रुपये देऊनही लवकर नंबर लागत नसल्याने शेतक-यांची (nashik farmer) धावपळ बघायला मिळत आहे.

Nashik : गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, मशिनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे कल

गहू काढणीला सुरुवात

Image Credit source: tv9marathi

नाशिक : मालेगावसह (malegaon) परिसरात गहू काढणीला (Wheat harvest) आलेला असून लवकरात लवकर गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी हार्वेस्टर मशिनला (to the harvester machine) प्राधान्य दिले जात आहे. एकीकडे कांदा काढणी सुरु आहे, तर दुसरीकडे त्याला भाव नाही. त्यामुळे हार्वेस्टर मशिनने कमी वेळात, कमी पैशात गहू काढणी होत आहे. अर्ध्या तासात एक एकर गहू काढला जात असल्याने हार्वेस्टर मशिनला मागणी वाढली असून एकरी दोन हजार रुपये देऊनही लवकर नंबर लागत नसल्याने शेतक-यांची (nashik farmer) धावपळ बघायला मिळत आहे.

धुळ्यात सुध्दा मजुरांची कमतरता असल्यामुळे यंत्राच्याद्वारे गहू काढणीला सुरुवात

मागील वर्षाच्या हंगामात काही अंशी कोरोना संसर्ग असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील काढणीला आलेला गहू पारंपारिक पद्धतीने काढला होता . यंदा मजुरांची कमतरता जाणवत असल्याने आता यंत्राच्याद्वारे गहू काढलेला सुरुवात झाली आहे. या अगोदर काही शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतात राबत गहू काढणी केली होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच आता अवघ्या काही दिवसांवर गहू काढण्यासाठी सुरुवात होणार आहे.

गेल्या तीन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच हार्वेस्टर यंत्र धारक आता दिसू लागले आहेत. यंदा त्यांची संख्या तुलनेत कमी असली तरी दिवसभरातून दहा ते पंधरा ठिकाणी गव्हाची काढणी यंत्र द्वारे केली जाते. सध्या हेक्टर मार्गे दोन हजार रुपये काढण्यासाठी आकाराले जाते असून यंदाच्या वर्षी गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चांगली आर्थिक उलाढाल होईल अशी अपेक्षा पंजाब वर आलेल्या यंत्रधारकांनी व्यक्त केलआहे .सध्या तालुक्यातील निमगुळ तसेच परिसरात गहू काढणी ला सुरुवात झाली असून तालुक्यातील इतर भागात येत्या दहा ते पंधरा दिवसानंतर गहू काढणी ला सुरुवात होईल .

हे सुद्धा वाचाधुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. उशिरापर्यंत चाललेल्या पावसामुळे या वर्षाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. रब्बी हंगामात घेतले गेलेले गहू पीक, हरभरा या पिकाचे उत्पन्न चांगले निघाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र गावाला भाव नसल्याने शेतकरी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. गव्हाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च अधिक असल्यामुळे हातात काही पडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत आहेत. दोन आठवड्यापूर्वी गव्हाला तीन हजार रुपये इतका भाव होता. मात्र आता हा भाव अवघ्या 2200 ते 2400 रुपयाला आला आहे. त्यामुळे तीन हजार रुपये भाव मिळावा अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Web Title – Nashik : गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ, मशिनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे कल – Farmers’ rush to harvest wheat, trend towards mechanized wheat harvesting

Leave a Comment

Share via
Copy link