3 रुपये किलोने विक्री करायचं की, जनावरांना चारायचं; कलिंगड उत्पादक पडले विचारात - 3 rupees to sell per kg or to feed the animals; Kalingad manufacturers were thinking - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

3 रुपये किलोने विक्री करायचं की, जनावरांना चारायचं; कलिंगड उत्पादक पडले विचारात – 3 rupees to sell per kg or to feed the animals; Kalingad manufacturers were thinking

विठ्ठल देशमुख

विठ्ठल देशमुख | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Feb 25, 2023 | 1:35 PM

दीड एकरमध्ये कलिंगड लावले. एक लाख दहा हजार रुपये खर्च आला. व्यापाऱ्याला माल दिला. २० टक्के माल अडीच रुपये किलोने नेला. ८० टक्के माल हा शेतातच सडत आहे.

3 रुपये किलोने विक्री करायचं की, जनावरांना चारायचं; कलिंगड उत्पादक पडले विचारात

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं कलिंगड कवडीमोल दरात व्यापारी घेतात. त्यामुळे मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कलिंगडांना पाळीव जनावरांना चारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलिंगडाची लाली यावर्षी फिकी पडली. वाशिम जिल्ह्यातील कलिंगडाला व्यापारी अडीच ते 5 रुपये प्रति किलोचा दर देतात. शेतकऱ्यांचा या पिकावरील खर्चही निघणे कठीण झाला आहे. शेतकऱ्यांवर लाखमोलाचे कलिंगड जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात मोरगव्हाण,किनखेड,मेहा परिसरात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली होती. मोरगव्हाण, किनखेड,मेहासह जिल्ह्यातील 1200 एकरहून अधिक क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली आहे.


Web Title – 3 रुपये किलोने विक्री करायचं की, जनावरांना चारायचं; कलिंगड उत्पादक पडले विचारात – 3 rupees to sell per kg or to feed the animals; Kalingad manufacturers were thinking

Leave a Comment

Share via
Copy link