येत्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मालेगाव-नगर, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

नाशिक : कांद्याच्या बाजारभावात घसरण (fall in prices) होत कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने येवला बाजार समितीत कांद्याचे लीलाव एक तास बंद पाडले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. येवला (Yewla) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीजास्त कांद्याला 732 रुपये, कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव आहे. साठ ते सत्तर हजार रुपये एकरी केलेला उत्पादन खर्च निघेनासा झालाय. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले.
Web Title – कांद्याने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी; कांदा उत्पादकांनी दिला हा इशारा – Onions brought water to the eyes of the growers; Onion producers gave this warning
