soybeans : लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनची पुन्हा आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव - In the Latur market, the arrival of soybeans again reduced, turi fetches good prices - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

soybeans : लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनची पुन्हा आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव – In the Latur market, the arrival of soybeans again reduced, turi fetches good prices

दोन वर्ष कोरोना होता, लोकांनी काय आत्महत्या करायची का मग ? तुम्ही शेतकऱ्यांची वीज कसे काय कट करून राहिले, तुम्ही शेतकऱ्यांची वीज कट करू नका. हे सरकार निर्दयी आहे

soybeans : लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनची पुन्हा आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव

अमरावती

Image Credit source: tv9marathi

लातूर : लातूरच्या बाजारपेठेत (Latur Market) सोयाबीनची पुन्हा आवक घटली आहे. सध्या सोयाबीनला ५ हजार ३७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव (Price of soybeans) घसरल्याने लागवड आणि मशागतीचा खर्च देखील मिळत नाही अशी खंत शेतकऱ्यांनी (Farmer) व्यक्त केली आहे. लातूरच्या बाजारपेठेत दररोज १५ हजार क्विंटल पेक्षा जास्त असलेली आवक आता आठ हजार क्विंटलवर येऊन ठेपली आहे. तुरीला मात्र ७ हजार ८३५ रुपये असा चांगला भाव मिळतो आहे. ज्वारी ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल विकली जात आहे.

पिकअप चालक सुखरूप असून टोमॅटो व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

टोमॅटो घेऊन नाशिकच्या बाजारात चाललेली पिकअप ही येवल्यातील विंचूर चौफुली येथे पलटी झाली. रस्त्यावर सगळीकडे टोमॅटो पसरले होते. या पिकअपमध्ये जवळपास 114 कॅरेट टोमॅटो भरला होता. हे सर्व टोमॅटो नाशिक येथील बाजारात घेऊन चाललेल्या असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विंचूर चौफुली येथे पिकअप पलटी होत, सर्व रस्त्यावर टोमॅटो पसरले. मात्र या झालेल्या अपघातामध्ये पिकअप चालक सुखरूप असून टोमॅटो व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची वीज कट केली, तर अधिकाऱ्यांना झोडा, यशोमती ठाकूर यांचा शेतकऱ्यांना सल्ला

दोन वर्ष कोरोना होता, लोकांनी काय आत्महत्या करायची का मग ? तुम्ही शेतकऱ्यांची वीज कसे काय कट करून राहिले, तुम्ही शेतकऱ्यांची वीज कट करू नका. हे सरकार निर्दयी आहे, शेतकऱ्यांची वीज जर कट केली, तर अधिकाऱ्यांना झोडा शेतकऱ्यांच्या वीजेला हात लावू नका, असा दम माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पाणीटंचाइचा आढावा घेतला, त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी वीज अधिकाऱ्यांना दम दिला.

हरभरा पिकाच चांगलं उत्पन्न येण्याची अपेक्षा

विदर्भातील रब्बीतील महत्वाचं पीक म्हणून ओळख असलेल्या हरभरा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा हजारो हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली असून,वातावरणात झालेल्या बदलामुळे काही ठिकाणी हरभरा पीक काढणी सुरू झाली आहे.यंदा हरभरा पिकाच चांगलं उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

पोषक वातावरणामुळे गहू व हरभरा पीक बहरला

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पोषक वातावरणामुळे गहू व हरभरा पीक चांगलेच बहरले आहे. सध्या अनेकांना हुडहुडी भरविणारी थंडी आरोग्यासाठी त्रासदायक ठरत असली तरी मात्र शेत शिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकासाठी ती पोषक ठरत आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर वातावरणात बदल झाल्याने पिकांना अनुकूल असे वातावरण तयार झाले, गहु हरभरा पिकांच्या वाढीसाठी व परिपक्व होण्यासाठी लागणारी थंडी सध्या असल्याने पिके चांगलीच जोमात आली आहेत.

हे सुद्धा वाचासाठवून ठेवलेल्या कापसावरील न दिसणाऱ्या सुक्ष्म किडीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट

मालेगावच्या टोकडे गावात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कापसावरील न दिसणाऱ्या सुक्ष्म किडीमुळे चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांना त्वचा विकार जडू लागले आहेत, सर्वांगाला खाज येणे, अंगावर लालसर डाग व फोड येणे, जखम होणे असे त्वचारोग पसरू लागल्याने ग्रामस्थामध्ये घबराट पसरली आहे. या आजाराची जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने टोकडे गावाला भेट देत तपासणी करून प्राथमिक उपचार म्हणून औषधांचे वाटप केले तर रक्ताचे नमुने घेतले. रक्त तपासणीचा अहवालानंतर उपचारा दिशा मिळणार आहे.


Web Title – soybeans : लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनची पुन्हा आवक घटली, तुरीला मिळतोय चांगला भाव – In the Latur market, the arrival of soybeans again reduced, turi fetches good prices

Leave a Comment

Share via
Copy link