शेतकऱ्यांवर संकटांवर संकट कोसळत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी लंपी आजारामुळं पशूधनांचा मृत्यू हे चालू असतानाचा जनावरांच्या चाऱ्याच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत.
मुंबईः महागाईच्या विळख्यात जसं जग सापडले आहे, तसाच भारतही सापडला आहे. महागाईमुळे (inflation) उद्योजकांपासून ते अगदी जनसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना त्याचा फटका बसला आहे. महागाईमुळे अनेक गोष्टी लोकांच्या अवाक्याबाहेर चालल्या आहेत. त्यामुळे आता आता शेतकऱ्यांसाठी (Farmers) आणि विशेषतः पशुपालकांसाठी एक वाईट आणि मोठी बातमी आली आहे. यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) चाऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात चारा महागाई वाढली आहे की, गेल्या 9 वर्षांची सर्वोच्च पातळी गाठली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आणि चारा महागाईचा परिणाम दुधाच्या दरावर होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मुसळधार आणि काही प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे देशातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सगळ्या मोठा फटका हा सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. जे लहान पशुपालक शेतकरी आहेत त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार झालेल्या पावसामुळे बाजरी पीक उद्ध्वस्त झाले आहे.
त्यामुळे या त्या त्या प्रदेशातील जनावरांच्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. जनावरांना घालण्यात येत असलेले पारंपारिक अन्न म्हणजे कोंडा. ते विकत घेणे आता कठीण होऊन बसले आहे.एका पेंढ्याची किंमत 700 ते 800 रुपये असा झाला आहे.
दुसरीकडे, देशातील 15 राज्यांमध्ये लंपी रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या रोगामुळे आतापर्यंत सुमारे 1 लाख जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 20 लाखांहून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे महागाईचा आणि रोगराईचा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
घाऊक किंमतीच्या निर्देशांकावर आधारित चाऱ्याचा महागाई दर ऑगस्ट हा 2022 मध्ये 25.54 टक्के आहे. जो गेल्या 9 वर्षांतील सर्वोच्च स्थानावर पोहचला आहे. डिसेंबर 2021 पासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
ही महागाई चाऱ्याच्या बाबतीत जशी झाली आहे, तशीचमहागाई ही गव्हाच्या बाबतीतही झाली आहे. काही राज्यातील गावांमधून 2200 रुपये क्विंटल दराने गहू मिळत आहेत.
तर कोरड्या चाऱ्याचा दर प्रतिक्विंटल हा 2 हजार रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोहरीचा भाव हा 1600 रुपये प्रति क्विंटल होता, आता त्याची किंमत 3000 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. त्यामुळे या महागाईत अन्नधान्य वाढवावे की जनावरे जगवावी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम दुधाच्या दरावर होत आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) या वर्षी ऑगस्टमध्ये चारा दरवाढीचा हवाला दिला आहे.
दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. चाऱ्याचे दर 20 टक्क्यांहून अधिक वाढले असले तरी दुधाचे दर त्या प्रमाणात वाढले नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
Web Title – मायबाप सरकार..! आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना करायचं काय ? आणि जगायचं कसं..? – Animal fodder prices rise, farmers suffer due to inflation
